“नवाब मलिकांचा राजीनामा घेणार नाही, पण…” जयंत पाटील म्हणाले

शुक्रवार, 18 मार्च 2022 (09:03 IST)
नवाब मलिक यांच्या कुर्ला येथील जमीन व्यवहारमध्ये ईडीने नवाब मलिक यांचे दाऊदशी संबध असल्याचे सांगत त्यांच्यावर कारवाई केली होती. दरम्यान, ह्या प्रकरणातील त्यांचा जामीन 16 मार्च रोजी न्यायालयाने फेटाळल्याने त्यांना कोठडीतच राहावे लागणार आहे. दरम्यान, नवाब मलिक ह्यांना अटक झाल्यापासून भाजपने नवाब मलिकांकडून महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा ही मागणी लावून धरली होती.
 
आज महाविकास आघाडीतील बड्या नेत्यांची बैठक शरद पवारांच्या सिल्व्हर ओक ह्या बंगल्यावर पार पडली. ह्या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ह्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी नवाब मलिक ह्यांच्याकडून राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्षपद तसेच परभणी व गोंदिया ह्या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्रीपदही काढून घेत असल्याची माहिती त्यांनी दिली. परभणीचे पालकमंत्रीपद धनंजय मुंडेंकडे तर, गोंदियाचं पालकमंत्रीपद प्राजक्त तानपुरेंकडे सोपावण्यात आलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती