कोरोनाच्या संकटकाळाच्या तब्बल दोन वर्षानंतर शारदीय नवरात्र निर्बंधांशिवाय साजरे होत आहे. सध्या नवरात्रीचा सण सम्पूर्ण देशात उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जात आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत भाविक गरबा खेळण्याचा आनंद लुटतात आणि हिंदी आणि गुजराती गाण्यांवर ठेका धरतात. देशात ठिकठिकाणी रास गरब्याचे आयोजन केले जाते. या वेळी नेहमी चर्चेत राहणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीत राजदरबार संस्थेच्या गरबा उत्सवाला उपस्थिती लावली.या वेळी त्यांच्या हस्ते देवीची पूजा करण्यात आली असून या वेळी नवनीत राणांनी गुजराती आणि हिंदी गाण्यावर ठेका धरून गरबा खेळण्याचा आनंद घेतला. त्यांचा गरबा खेळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांच्या फेसबुक अकाउंट वरून त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.