ग्रामपंचायतीसाठी होणार 16 ऑक्टोबरला मतदान

मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (09:08 IST)
विविध 18 जिल्ह्यातील 82 तालुक्यांमधील, 1165 ग्रामपंचायतींच्या निवडणुकींसाठी 13 ऑक्टोबरऐवजी 16 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. मतमोजणी 14 ऐवजी 17 ऑक्टोबरला होईल अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. 
आयोगाने 7 सप्टेंबरला 1165 ग्रामपंचायतींच्या निवणडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यात सदस्यांसह थेट सरपंचाचाही समावेश आहे. सुधारित कार्यक्रमानुसार 16 ऑक्टोबरला सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 पर्यंतच मतदानाची वेळ असेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती