मुंढे यांना राष्ट्रीय महिला आयोगाची नोटीस

मंगळवार, 7 जुलै 2020 (08:48 IST)
नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना राष्ट्रीय महिला आयोगाने नोटीस पाठवली आहे. स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनच्या कंपनी सेक्रेटरी महिलेने मॅटर्निटी बेनिफिट नाकारल्याबद्दल आणि मानसिक छळ तसेच अपमानास्पद वागणुकीची तक्रार राष्ट्रीय महिला आयोगाकडे केली होती. या वागण्यावर आक्षेप घेत तुकाराम मुंढे यांना राष्ट्रीय महिला आयोगाने नोटीस बजावली आहे. सात दिवसात योग्य तो अहवाल सादर करावा असंही म्हटलं आहे.
 
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सीईओपदाचाही कार्यभार आहे. स्मार्ट सिटीतील महिला अधिकाऱ्याने आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अपमानजनक वागणुकीची तक्रार दहा दिवसांपूर्वी राष्ट्रीय महिला आयोगाकडे केली होती. आयुक्त तुकाराम मुंढे हे नेहमी इतर अधिकाऱ्यांपुढे अपमान करतात, प्रत्येक स्त्री कर्मचाऱ्याचा अधिकार असलेली प्रसूती रजा व लाभही मला नाकारण्यात आला असं त्यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटलं होतं. ज्यानंतर आता राष्ट्रीय महिला आयोगाने तुकाराम मुंढे यांना नोटीस बजावली आहे व उत्तर देण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती