Nashik :तलवार घेवून रिल्‍सचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकणे तरुणाला भोवले

शुक्रवार, 20 जानेवारी 2023 (13:13 IST)
सध्या सोशल मीडियावर रिल्स बनवून टाकणे हे तरुणांसाठी छंदच आहे.आजचा तरुण वर्ग वेगवेगळे रिल्स बनवून सोशल मीडियावर टाकतात. नाशिकमध्ये एका तरुणाला सोशल मिडीयावर हातात तलवार घेऊन चित्रपटाच्या गाण्यावर रिल्स बनवून टाकणे चांगलेच भोवले आहे. सोशल मीडियावर हा रिल्स व्हायरल झाल्यावर पोलिसांनी या तरुणाला अटक केली. नाशिकच्या भारत नगर येथे राहणाऱ्या 19 वर्षीय तरुण फैजान नईम शेख या तरुणाने हिंदी चित्रपटाच्या गाण्यावर हातात तलवार घेऊन रिल्स बनवून सोशल मीडियाच्या एका प्लॅटफॉर्मवर शेअर केला. हा व्हिडीओ वाहने व्हायरल झाला. पोलिसांनी हा व्हिडीओ पाहिल्यावर या तरुणाचा शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेतले आणि त्याच्या कडून तलवार जप्त केली. पोलिसांनी त्याची चौकशी केल्यावर फैजान याने तलवार भारतनगर मध्ये राहणाऱ्या सचिन इंगोले यांच्याकडून घेऊन रिल्स साठी वापरण्याचे सांगितले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. 
 
Edited By - Priya Dixit  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती