संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा 2023 :संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रेला सुरुवात

बुधवार, 18 जानेवारी 2023 (10:31 IST)
निवृत्तिनाथ हे संत ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू. नाथ संप्रदायातील गहिनीनाथांनी निवृत्तिनाथांना दीक्षा दिली. निवृ​त्तिनाथांचे जन्मवर्ष 1273 ​किंवा 1268 असे सां​गितले जाते. ज्ञानेश्वर, सोपानदेव मुक्ताई, निवृत्तिनाथ ह्या चार भावंडांमधे निवृत्तिनाथ हे थोरले होते. निवृ​त्तिनाथ हे ज्ञानेश्वरांचे गुरू होते. निवृत्तिनाथांनी ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी गीता सामान्य लोकांना उमजेल अशा शब्दांत लिहिण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका(ज्ञानेश्वरी) लिहून काढली. आज संत निवृत्तीनाथ महाराजांची मोठी यात्रा नाशिकच्या त्र्यंबकेश्र्वराला भरते. टाळ, चिपळी , मृदूंगाच्या गजरात या यात्रेच्या निमित्ताने हजारो वारकरी बंधू नाशिकात दाखल होतात. त्र्यंबकेश्वर वैष्णव संप्रदायाची भूमी असून निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शनासाठी वारकरी त्र्यंबकेश्वरात दाखल होतात. या दिवशी यात्रा असते. यात्रा उत्सवात पालखीची मिरवणूक काढली जाते. दिंड्याघेऊन आलेले वारकरी मंदिरात भजन , अभंग कीर्तन करतात. हजारोच्या संख्येत एकत्र झालेल्या वारकऱ्यांनी मंदिराचे प्रांगण गजबजून गेले. आज पासून सुरु होणाऱ्या संतश्रेष्ठ निवृत्ती नाथ महाराजांच्या यात्रेला सुरुवात झाली असून नाशिकच्या अंजनेरी ब्रह्मगिरीच्या कुशीत वसलेल्या त्र्यंबक नगरीत ज्योतिर्लिंगाच्या सान्निध्यात व गोदातिरी मोठ्या भक्तीभावात  गळ्यात तुळशी माळा, डोक्यावर तुळशीवृंदावन, हाती टाळ, मृदुंग, भगव्या पताका घेतलेले वारकरी आल्यामुळे परिसर भरलेले आहे.निवृत्ती नाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची भलीमोठी रांग दिसत आहे. 

 त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रोत्सवानिमीत्त लाखो वारकरी त्र्यंबकेश्वरला जात असतात. या काळात वारकऱ्यांबरोबरच वाहनाने प्रवास करणारेही अनेक भक्त त्रंबक कडे रवाना होत असतात.
 
यासाठी म्हणूनच नाशिक त्रंबक नियमित चालणाऱ्या बस सेवांबरोबरच ज्यादा बस सेवा सुरू करण्याचा निर्णय सिटी लिंकच्या वतीने घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे दोन दिवसात तब्बल 246 बस फेऱ्या सिटीलिंकच्या होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
 
श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होण्यासाठी त्र्यंबकेश्वरकडे मार्गस्थ होत आहे. पायी दिंडी आधीच त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होत असल्या तरी बुधवारी हजारो भाविक त्र्यंबकेश्वर याठिकाणी दर्शनासाठी जाणार असल्याने भाविकांच्या सोयीसाठी नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.
 
 
Edited By- Priya Dixit  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती