नाशिक :अंधश्रद्धा निर्मूलन समिती कडून बारा वाजताच्या सुमारास ‘स्मशान सहल’ आयोजित

सोमवार, 26 सप्टेंबर 2022 (15:03 IST)
नाशिक जनप्रबोधनासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धींगत होण्यासाठी रविवारी (दि.२५) रात्री दहा ते बारा वाजताच्या सुमारास ‘स्मशान सहल’ आयोजित करण्यात आली होती. याबाबतचे मॅसेजदेखील सोशलमिडियावरून व्हायरल करण्यात आले; मात्र संध्याकाळच्या सुमारास संयोजकांनी पोलीस आयुक्तांची लेखी परवानगी आवश्यक असल्याने तुर्तास सहल रद्द केल्याचेही सोशल मिडिया द्वारे मॅसेजमधून जाहीर केले.
 
शालेय विद्यार्थ्यांच्या मनातील भुतबाधेविषयीचे समज-गैरसमज दुर व्हावेत, अंधश्रद्धेविषयीचे निर्मूलन करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस)ने शालेय विद्यार्थ्यांच्या स्मशान सहलीचे नियोजन केले. अंनिसचे जिल्हा संयोजक व्ही. टी. जाधव यांनी सर्वांना याबाबत कल्पनाही दिली. मात्र यासाठी पोलीस आयुक्तालाकडे कुठल्याहीप्रकारे लेखी अर्ज करण्यात आला नव्हता. यामुळे पंचवटी पोलिसांनी रविवारी सायंकाळी या सहलीला परवानगीअभावी स्थगिती दिली. किमान लेखी अर्ज अपेक्षित होता, असे मत पोलिसांनी मांडले. तर, यापूर्वी कधीही अर्ज न केल्याचा दावा अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती