नाशिक मध्ये एका बड्या व्यावसायिकाचे त्याच्या घरासमोरून अपहरण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. हेमंत पारख असे या व्यावसायिकाचे नाव असून ते बांधकाम व्यवसायी आणि गजरा ग्रुपचे प्रमुख आहे. त्यांचे अपहरण त्यांच्या राहत्या घरासमोरून इंदिरानगर भागातून रात्री 9: 30 च्या सुमारास ते घरासमोर फिरत असताना केले. काही अज्ञात व्यक्ती कार मधून आले आणि त्यांचे अपहरण करून नेले.