एमडी (मेफड्रोन) च्या उत्पादनासाठी शिंदे गावात कारखान्याच्या उभारणीत मुंबईतील संशयित हरिशपंतचा सहभाग चौकशीतून उघड झाला आहे.पोलिस कोठडीत असलेल्या मुख्य सूत्रधार ललित पाटील (पानपाटील) याच्या चौकशीत आणखी विविध खुलासे होत असून, रॅकेट उद्ध्वस्त करण्यासह दोषींवर कारवाईसाठी महत्त्वपूर्ण माहिती पोलिसांना मिळत असल्याचे सूत्रांनी सांगितले.पोलिस कोठडीतील सर्वच संशयितांची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे.
या प्रकरणात आत्तापर्यंत पोलिसांनी ललितसह त्याचा भाऊ भूषण पाटील (पानपाटील), अभिषेक बलकवडे, रोहित चौधरी, हरिशपंत, शिवा शिंदे, झिशान शेख यांना गजाआड केले आहे.
दरम्यान, एमडी ड्रग्ज उत्पादनासाठी आवश्यक असलेले सूत्र (फॉम्युला) कोठून प्राप्त झाला, भांडवल कुणी पुरवले, याबाबत पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.