अनेक ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी लिलाव लावला जात आहे. अगदी असाच प्रकार नाशिक जिल्ह्यातला उमराणेत समोर आला आहे. कांदा बाजार समितीमुळे उमराणे गाव नावारूपाला आले आहे. यावर्षी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरवण्यात आलं होतं. त्यानुसार रितसर गावाचे ग्रामदैवत असलेल्या श्री रामेश्वर महाराज मंदिर आवारात लिलावात बोली लावण्यात आली.
या लिलावात १ कोटी ११ लाखांपासून सुरु झालेल्या लिलाव हा २ कोटी ५ लाखावर पोहोचला. माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत देवरे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचे सुनील दत्तू देवरे यांनी हा लिलाव जिंकल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. लिलावाचा हा पैसा रामेश्वर महाराज यांच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी वापरला जाणार आहे.