या महोत्सवासाठी परमपूज्य जगद्गुरु शंकराचार्य संकेश्वर करवीर पीठ स्वामी श्री सच्चिदानंद अभिनव विद्या नृसिंह भारती स्वामी हे अध्यक्ष पद भूषवणार आहे. तसेच या महोत्सवात महाराष्ट्रातून साधारणपणे साडेचारशे नामवंत किर्तनकार उपस्थित राहणार असून किर्तनकारांमधील नव्याने शिक्षण घेऊन धर्मप्रसाराचे कार्य करण्यासाठी तत्पर असलेली तरुण किर्तनकार मंडळी या महोत्सवात कीर्तनाचे कार्यक्रम करणार आहे. तर काही ज्येष्ठ व श्रेष्ठ कीर्तनकार यांचे मार्गदर्शनपर प्रवचने होणार आहे. या कार्यक्रमासाठी संस्थान श्री काळाराम मंदिर अध्यक्ष व विश्वस्त मंडळ, भद्रकाली अखंड कीर्तन सत्र मंडळ, चतुशाखीय ब्रह्मवृंद गायरान ट्रस्ट मंडळ, शुक्ल यजुर्वेदीय माध्यम दिन माध्यदिन ब्राह्मण संस्था यांच्यासह नाशकातील अनेक कीर्तनप्रेमींचे सहकार्य लाभणार आहेत.
अशाप्रकारे तीनही दिवस भरगच्च कार्यक्रम श्री काळाराम मंदिरातील आवारात संपन्न होणार असून या कार्यक्रमाला सर्व नाशिककरांनी किर्तन प्रेमी लोकांनी उपस्थित राहून श्रवणानंदाचा लाभ घ्यावा अशी विनंती कीर्तन मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष आदींसह काळाराम मंदिर पुजारी यांनी आवाहन केले आहे.