नारायण राणे काढणार मुंबई ते कोकण जन आशीर्वाद यात्रा

शुक्रवार, 13 ऑगस्ट 2021 (15:09 IST)
केंद्रीय लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे जन आशीर्वाद काढणार आहे.ही जन आशीर्वाद यात्रा मुंबई ते कोकणापर्यंत निघणार आहे.त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पक्षबळकटीचं नियोजन करून ही यात्रा 19 ऑगस्ट पासून मुंबईतून सुरु करणार आहे.19 आणि 20 ऑगस्ट या दोन दिवस ही यात्रा मुंबईत असणार.नंतर 21 ऑगस्टला वसई,विरार,नंतर 23 ऑगस्ट रोजी दक्षिण रायगड,24 ऑगस्ट रोजी चिपळूण,25 ऑगस्ट रत्नागिरी आणि 26 ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग येथे या यात्रेचे समापन होणार आहे.राणे यांनी मंत्रिपद स्वीकारल्यावर ते प्रथमच थेट जनतेशी संपर्क साधणार  आहे.
 
राणे यांनी माध्यमांशी बोलताना राज्य सरकारवर हल्लाबोल केला होता.मी महाराष्ट्रात 16 तारखे नंतर येणार असे ही त्यांनी सांगितले.राज्य अधोगतीकडे वळत आहे. लोकांमध्ये जनजागृती करण्याची नितांत गरज आहे.असे ही ते म्हणाले.नंतर ते चिपळूणजाऊन पुरग्रस्तांची भेट घेणार.केंद्र सरकारने पूरग्रस्तांसाठी 700 कोटी रुपये दिले आहे.तर राज्य सरकारने केवळ 10 हजार रुपये दिले.ते पैसे लोकांनी पिंपात टाकले.आता ते फुगून बाहेर येणार ''.असा टोमणा राणे यांनी राज्य सरकारला लगावला.
 
केंद्र सरकारने घेतले चांगले निर्णय जाणते पर्यंत कसे न्यायचे याचा एक आढावा तयार करण्याचे देखील राणे यांनी सांगितले.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती