नांदेड शासकीय रुग्णालय मृत्यूकांड, मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

मंगळवार, 3 ऑक्टोबर 2023 (08:29 IST)
मुंबई  : ठाणे रुग्णालयातील मृत्यूचे प्रकरण ताजे असतानाच नांदेड जिल्हा रुग्णालयात औषधांच्या तुटवड्यामुळे २४ तासांत २४ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब पुढे आल्याने खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी याची सखोल चौकशी केली जाईल, असे सांगितले.
 
नांदेडच्या शासकीय रुग्णालयात २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.हाफकीनने औषधी खरेदी बंद केल्यामुळे राज्यभरातील शासकीय रुग्णालयात औधधांचा प्रचंड तुटवडा जाणवत असून, यामुळेच रुग्णांच्या मृत्यूची संख्या वाढत असल्याचा आरोप आहे. नांदेड येथील घटनेची उच्च स्तरीय समिती नेमून चौकशी केली जाईल, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. आमचे आयुक्त तात्काळ आजच तिकडे गेले आहेत. मीदेखील उद्या जाऊन सर्व घटनेचा आढावा घेणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. चौकशी केल्याशिवाय हे सर्व प्रकरण नेमकं काय आहे हे समजणार नाही, असे मुश्रीफ यांनी सांगितले.
 
या रुग्णालयात परभणी, हिंगोली, तेलंगणाचा सीमाभाग येथील रुग्ण येतात. खासगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर सुरुवातीला उपचार सुरू होतात. तिथं त्यांच्यात सुधारणा झाली नाही आणि हॉस्पिटलचे बिल वाढत गेले तर त्यांना सरकारी रुग्णालयात भरती केलं जातं; पण २४ तासांत २४ मृत्यू होणं ही गंभीर गोष्ट आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती