तमिळ अभिनेता विशालने सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने लाच घेतल्याचा आरोप करून चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. त्याच्या मार्क अँटनी चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीच्या सेन्सॉर प्रमाणपत्रासाठी सीबीएफसीने 6.5 लाख रुपयांची लाच घेतल्याचा दावा अभिनेत्याने केला आहे. व्हीडीओद्वारे त्याने सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन म्हणजेच सेन्सॉर बोर्डावर धक्कादायक आरोप केले आहेत.
त्याच्या मार्क अँटनी या चित्रपटाच्या ,हिंदी व्हर्जनला प्रमाणपत्र देण्याच्या बदल्यात सेन्सॉर बोर्डाच्या अधिका-यांनी लाच मागितल्याचा खुलासा विशालने केला. सेन्सॉर बोर्डाकडून साडेसहा लाख रुपये मागण्यात आले होते, असे त्याने म्हटले आहे. यामध्ये त्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या प्रकरणात दखल देण्याची विनंती केली आहे. विशालने हे सुद्धा स्पष्ट केले की, त्याच्या टीमने चित्रपटाच्या सर्टिफिकेटसाठी ऑनलाईन अर्ज केला होता आणि काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांना शेवटच्या क्षणी हे पाऊल उचलावे लागले होते.