Nanded : नांदेडमध्ये रूग्णालयाच्या डीन कडून शौचालय स्वच्छ!

मंगळवार, 3 ऑक्टोबर 2023 (16:07 IST)
Nanded :नांदेड मध्ये शासकीय रुग्णालयात रुग्णाच्या मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली असताना आता नांदेड मध्ये शासकीय रुग्णालयाच्या स्वच्छतागृहाला रुग्णालयाच्या डीन कडून स्वच्छ करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयाचा पाहणी दौरा केल्यावर त्यांना रुग्णालयात सर्वत्र घाण आढळून आली. पाहणी करताना त्यांच्या सोबत रुग्णालयाचे डीन देखील होते.
 
 हेमंत पाटील यांनी डीन कडून स्वच्छतागृह स्वच्छ करायला लावले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणामुळे खासदार हेमंत पाटीलांवर टीका केली जात आहे. 

या वर प्रतिक्रिया देत असताना खासदार हेमंत पाटील म्हणाले, मी डीनच्या कार्यालयात गेलो असता बघितले की, त्यांच्या केबिनमधील स्वच्छतागृहातील एक स्वच्छतागृह बंद होते. एकात सामान भरून ठेवले आहे. बेसिन तुटलेलं आहे, पाणी नाही. स्वच्छता नाही, कोणतीही सोय नाही. डीन ने रुग्णालयाच्या वार्ड मध्ये जाऊन पाहणी केली पाहिजे, दारूच्या बाटल्या पडल्या आहेत, स्वच्छता नाही, सामान्य जनतेने काय करावं, कुठं जावं, प्रशासनाने जबाबदारीने काम करावं.  
 
तर या वर भाष्य करताना काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण म्हणाले, मी काही डिनचं समर्थन करत नाही. ते शासकीय रुग्णालय आहे. कामासाठी लोक कमी पडत असतील, डीन एकटे यावर काय करतील सरकारने यावर लक्ष दिले पाहिजे आणि लवकर निर्णय घेतले पाहिजे .डीन कडून स्वछतागृह स्वच्छ करण्याचे हे कृत्य काही उचित नाही. 
 
Edited by - Priya Dixit  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती