नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी इथे जयश्री रामटेके नावाच्या महिलेला जमावाने अशाच संशयावरुन मारहाण केली. मात्र, पोलिस वेळेवर आल्याने तिचा जीव वाचला आहे.नागपूरच्या जरीपटका पोलिस स्टेशन हद्दीतील हुडको कॉलनीत जयश्री रामटेके राहतात. पक्षाघात झालेल्या रुग्णांना तेल मालिश त्या करतात.
पारशिवनी तालुक्यातील करंभाड गावात जयश्री वपरिसरातून जात असताना लहान मुले खेळत होती. मुलांनी जयश्रीची वेशभूषा पाहून मुलांनी चोर-चोर ओरडण्यास सुरुवात केली. मुलांच्या आवाजाने परिसरातील महिला-पुरुष जमा झाले. त्यांनी जयश्रीला घेरुन प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. सध्या मुलं चोरणाऱ्या टोळीची अफवा असल्याने जमावाने तिला चोर समजून मारहाण करण्यास सुरुवात केली होती.
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दिलीप आगरकर आणि महिला पोलिस कर्मचारी संगीता घटनास्थळी दाखल झाल्या. घटनास्थळी सुमारे 200 जणांचा जमाव होता. महिला पोलिस कर्मचारी संगीता यांनी जमावाच्या तावडीतून जयश्रीला आपल्या ताब्यात घेतलं. नंतर पोलिस उपनिरीक्षक दिलीप आगरकर यांनी आपल्या बाईकवर बसवून तिला पोलिस स्टेशनला आणले होते. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.