अलिबागमध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई- रायगढ जिल्ह्यातील अलिबागमध्ये एका कुटुंबातील पाच जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यावर गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला या मागील कारणाचा अद्याप उलगडा झालेला नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.
 
अलिबाग तालुक्यातील आक्षी येथे राहणाऱ्या राहुल पाटिल यांच्या घरातील पाच सदस्यांनी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. यातील दोन लहान मुलांची प्रकृती चिंताजनक आहे. रामचंद्र पाटील (वय ६०), रंजना पाटील (वय ५०), कविता राहुल पाटील पाटील (वय २५), स्वराली पाटील (दीड वर्षे)  आणि स्वराज पाटील (दीड वर्षे)  अशी त्यांची नावे आहेत.
 
आजी- आजोबा, सूनबाई आणि त्यांची दीड वर्षांची जुळी मुले अशा पाच जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाची लोकांना कोल्ड ड्रिकमध्ये विष काळवून सेवन केले. नंतर त्यांना उल्ट्या होऊ लागल्या. लहान मुलांच्या ओरड्यांची आवाज ऐकून शेजारचे घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी सर्वांना रुग्णालयात भरती केले.
 
सामूहिक आत्महत्येमागे अंधविश्वास असावा अशी शंका असली तरी स्पष्ट कारण कळून आलेले नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती