महाराष्ट्रातील नागपुरात 'काळ्या जादू'च्या नावाखाली एका पाच वर्षीय मुलीला तिच्या पालकांनी बेदम मारण्याची धक्कादायक घटना घडली आहे.ही घटना शुक्रवार-शनिवारी मध्यरात्री घडल्याचे पोलिसांनी सांगितले.पोलिसांनी मुलीचे वडील सिद्धार्थ चिमणे, आई रंजना आणि काकू प्रिया बनसोड यांना अटक केली आहे.
सुभाष नगरमध्ये राहणारा सिद्धार्थ चिमणे गेल्या महिन्यात गुरुपौर्णिमेला तो आपली पत्नी,6 आणि 16 वर्षांच्या दोन मुलींसह टाकळघाट परिसरातील दर्ग्यावर गेला होता.काही दिवसांपासून सिद्धार्थ चिमणे आणि रंजना चिमणे यांच्या मुलीची तब्येत बरी नव्हती. ती बरी होत नसल्याने आपल्या मुलीला भूताने पछाडल्याचा संशय चिमणे पती-पत्नीला आला.
व्हिडिओमध्ये आरोपी रडणाऱ्या मुलीला काही प्रश्न विचारताना दिसत आहेत.अधिकाऱ्याने सांगितले की, मुलीला प्रश्न समजू शकले नाहीत.यादरम्यान तिन्ही आरोपींनी मुलीला बेदम मारहाण केली, त्यानंतर ती बेशुद्ध होऊन जमिनीवर पडली.यानंतर आरोपीने शनिवारी सकाळी मुलीला एका दर्ग्यात नेले.त्यानंतर त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले व तेथून पळ काढला.
आरोपींना रुग्णालयाच्या सुरक्षा कर्मचार्यांनी पकडले आणि रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकाने त्यांच्यावर संशय घेतला आणि त्यांच्या मोबाईल फोनवर त्यांच्या कारचे छायाचित्र घेतले, असे अधिकाऱ्याने सांगितले, हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी नंतर मुलीला मृत घोषित केले आणि पोलिसांना कळवले.वाहन नोंदणी क्रमांकाच्या आधारे आरोपींची ओळख पटली.
पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, राणा प्रताप नगर पोलीस ठाण्याचे अधिकारी आरोपीच्या घरी पोहोचले आणि या घटनेप्रकरणी पोलिसांनी सिद्धार्थ चिमणे, रंजना चिमणे आणि रंजना बनसोड या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तिघांनाही अटक केली आहे.मानवी बळी दिल्याच्या गुन्ह्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना रविवारी न्यायालयासमोर हजर केलं जाईल.