पिंपरी-चिंचचवड शहरवासीयांच्या जीविताचा विचार करुन महापालिका 15 लाख कोरोना प्रतिबंधक लस स्वखर्चाने खरेदी करण्यास तयार आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्र शासनाची त्वरीत परवानगी मिळावी, अशी मागणी महापौर उषा ढोरे यांनी केली. महापौर ढोरे यांच्या दालनात आयुक्त राजेश पाटील यांच्या समवेत झालेल्या बैठकीत ही मागणी करण्यात आली.
तथापि, लशींच्या अपु-या पुरवठ्यामुळे लसीकरणाची संख्या कमी आहे. त्यामुळे लस उत्पादक कंपनीकडून सदर लस थेट खरेदी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यासंबंधीचा लस खरेदी करण्याचा ठराव नुकत्याच झालेल्या स्थायी समिती सभेत मंजूर करण्यात आला असल्याची माहिती महापौर ढोरे यांनी दिली.