मिळालेल्या माहितीनुसार, कुत्र्यांच्या गळ्यात जे कार्ड लावण्यात आले आहेत त्यावर क्यूआर कोड आहे. त्याची सर्व माहिती QR कोड स्कॅन करून मिळवता येते. हा क्यूआर कोड स्कॅन केल्यावर कुत्र्याचे नाव, लसीकरणाचा तपशील, कुत्र्याची नसबंदी आणि इतर माहिती उपलब्ध होईल.
कुत्रा हरवला तर या कार्डच्या मदतीने त्याचा शोध घेऊन त्याच्या कुटुंबाशी पुन्हा जोडले जाऊ शकते. यासोबतच कुत्र्यांचा डाटाबेस तयार करण्यात येणार असून, त्यावरून शहरात किती कुत्रे आहेत, याची माहिती मिळणार आहे.