Aadhaar Ration Link Process: आधार कार्डवर रेशन

बुधवार, 26 ऑक्टोबर 2022 (14:34 IST)
Aadhaar Ration Link Process: रेशन कार्ड योजनेअंतर्गत, सरकार देशातील गरीब आणि मध्यम उत्पन्न गटांना मोफत किंवा कमी दराने रेशन पुरवते. कोरोना महामारी सुरू झाल्यापासून देशातील सुमारे 80 कोटी लोकांना मोफत रेशन दिले जात आहे. सरकारने मोफत रेशन देण्याची मुदत सप्टेंबर 2022 पर्यंत वाढवली आहे. परंतु, साथीच्या काळात अनेकांना रेशनकार्ड असूनही रेशनची सुविधा मिळत नव्हती.
 
 याचे सर्वात मोठे कारण म्हणजे परप्रांतीय मजूर कामानिमित्त दिल्ली, मुंबई इत्यादी मोठ्या शहरात राहतात. त्यांचे रेशनकार्ड त्यांच्या गृह जिल्ह्याचे होते. ही समस्या लक्षात घेऊन सरकारने ‘वन नेशन वन रॅश कार्ड’ योजना सुरू केली होती. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शिधापत्रिका आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे.
 
 'वन नेशन वन रेशन कार्ड'च्या माध्यमातून कोणत्याही शिधापत्रिकाधारकाला देशाच्या कोणत्याही भागातील रेशन दुकानातून रेशन मिळू शकते. तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लवकरात लवकर शिधापत्रिका आधार लिंक करा. तुम्ही दोन्ही लिंक करण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रक्रिया वापरू शकता. चला तर मग जाणून घेऊया -
 
ऑफलाइन राशन कार्ड  याप्रमाणे लिंक करा-
शिधापत्रिका आधार कार्डशी लिंक करण्यासाठी, तुम्ही प्रथम आधार कार्डची एक प्रत आणि पासपोर्ट आकाराचा फोटो घ्यावा. रेशनकार्ड दुकानात जाऊन एक फॉर्म भरावा लागेल. तुमचे बायोमेट्रिक घेतले जाईल. यानंतर रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक होतील. आधार रेशन लिंकिंगची माहिती आधार नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर येईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती