देशाच्या एवढ्या मोठ्या निर्णयात दोन वरिष्ठ नेत्यांमध्ये एवढे अंतर असेल तर हे चिंताजनक असल्याची टिप्पणी त्यांनी केली. पुण्यात मनपा आढावा बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील ईतर विषयांवर ही भाष्य केले. शिवसेनेच्या 2014 मधील सरकार स्थापण्याच्या प्रस्तावावर बोलताना या संदर्भात मला काही माहिती नाही. त्यामुळे मी बोलणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी या विषयावर मौन पत्करले.
त्याचबरोबर नाईट लाईफवर कोणतेही मतभेद नाही. मंत्री आदित्य ठाकरे आणि अनिल देशमुख यांचे विधान हे मॅचिंग होणार आहे. सरकारमध्ये कोऑर्डिनेशन असल्याचेही त्यांनी म्हटले. ट्रान्सजेंडर कमिटीसाठी एक वेगळे वेल्फेअर बोर्ड संदर्भात बैठक झाली. मंत्री धनंजय मुंडे यांनी 21 दिवसात हे बोर्ड करून त्याचे काम सुरू होईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे बोर्डची स्थापना झाल्यानंतर त्यांना अधिकाराचा प्लॅफॉर्म मिळेल. त्या माध्यमातून त्यांचे प्रश्न मनमोकळेपणाने मांडू शकतील असे म्हटले.