नागपुरात 3 मुलांची आई अल्पवयीन प्रियकरासह पळाली

शुक्रवार, 7 मार्च 2025 (21:35 IST)
प्रेमात कोणतेही बंधन नसते असे म्हणतात. प्रेम कोणत्याही वयात होऊ शकते. असे म्हणतात. मात्र नागपुरात 3 मुलांची आई तिच्यापेक्षा 20 वर्षाने लहान अल्पवयीन मुलाचा प्रेमात पडली. नंतर ती आपल्या 3 मुलांपैकी एका मुलाला घेऊन अल्पवयीन प्रियकरासह पळाली आहे. 

अल्पवयीन मुलगा बेपत्ता झाल्यावर त्याचा शोध करून देखील तो सापडला नाही. नंतर गुन्हे शाखे मानव तस्करी विरोधी पथकाने तपास सुरु केला आणि मुलाचा शोध घेत मध्यप्रदेशातील बालाघाट येथे पोहोचले तिथे हा मुलगा एका महिलेसह सापडला. पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत महिलेला अटक केली आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला 36 वर्षाची असून आपल्या पती आणि 3 मुलांसह वाठोडा परिसरात राहत होती. तिची भेट 11 वीत शिकणाऱ्या 16 वर्षाच्या मुलाशी झाली नंतर ते मोबाईलवर बोलू लागले आणि ही मैत्री प्रेमात बदलली. महिला आपल्या वैवाहिक जीवनात सुखी नसल्याने त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. ते पळून पुण्याला गेले नंतर दोघे काही दिवसांनंतर परतले. त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या प्रेम संबंधाबद्दल समजले. मुलाच्या वडिलांनी त्याला रागावले आणि समजावले. तसेच महिलेचे तिच्या पतीशी वाद झाले. 

2 डिसेम्बर रोजी मुलगा कॉलेजला जाण्यासाठी निघाला आणि परत घरी आलाच नाही. कुटुंबीयांनी पोलिसांत बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली. महिला तिच्या लहान मुलासह घरातून बेपत्ता झाली. नंतर ते दोघे पळून बालाघाटला गेले आणि तिथे स्थायिक झाले. महिलेने तिचे सोन्याचे दागिने विकले आणि खोली भाड्याने घेतली आणि तिथे राहू लागले. 
मुलाने केटरिंगचे काम करायला सुरु केले आणि महिला स्वयंपाकी म्हणून काम करू लागली. बेपत्ता मुलाचा शोध कुठेच न लागल्याने प्रकरण  एएचटीयूकडे सोपवण्यात आले. 

दरम्यान मुलाने त्याच्या बहिणीला मोबाईलवर मेसेज पाठवून तिच्या प्रकृतीची विचारणा केली. पोलिसांनी त्याच्या मोबाईलच्या लोकेशनच्या आधारे पोलिसांनी त्याच्या शोध घेतला.

एएचटीयूचे पोलीस पथकाने बालाघाट येथून दोघांना अटक केली. मुलगा स्वतःच्या इच्छेने महिलेसोबत राहत असल्याचे त्याने सांगितले मात्र अल्पवयीन असल्याने पोलिसांना त्याला ताब्यात घेऊन महिलेला अटक केली आहे. 
Edited By - Priya Dixit 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती