वाल्मिक कराड ज्यांना आका देखील म्हणतात. त्यांच्या अडचणीत वाढ होत आहे. या प्रकरणात सीआयडीने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात वाल्मिक कराड दोषी असल्याचे पुरावे दिले आहे.मात्र कराड यांच्या वकिलाने दिलेल्या युक्तिवादात त्यांनी कोणाकडूनही थेट खंडणी मागितली नाही असे सांगण्यात आले. आता या प्रकरणात पोलिसांच्या हाती नवा पुरावा लागला आहे.
या मध्ये सुदर्शन घुले नावाच्या व्यक्तीला कराड यांच्या सांगण्यावरून आवादा कंपनीकडून खंडणी आणण्यासाठी पाठवले होते. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी हे संपूर्ण प्रकरण मोबाईलमध्ये कैद केले. व्हिडीओ मध्ये घुले कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगताना दिसत आहे की कंपनीच्या 100 लोकांना सांभाळण्या ऐवजी कराड यांना संभाळण्याकडे लक्ष द्या आणि कराडांनी मागितलेले 2 कोटी रुपये त्यांना द्या म्हणजे तुमचे काम देखील सुरळीत होणार.