त्या म्हणाल्या, मला दोन दिवसांपूर्वी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे दोन दिवसांपूर्वी त्यांचा राजीनामा लिहिला आहे. धनंजय मुंडे म्हणाले होते की, वाल्मिक कराड चौकशीत दोषी आढळला तर मी राजीनामा देईन. त्यामुळे धनंजय मुंडे आता सोमवारी शंभर टक्के राजीनामा देणार आहे. अजित दादा त्यांना मंत्रिमंडळातून काढतील अशी माहिती मला मिळाली आहे.