पिंटू दुर्योधन मिंढे वय वर्ष अडीच , शंभू दुर्योधन मिंढे वय वर्ष सव्वा अशी दोन्ही मयत झालेल्या मुलांची नावे आहे. या प्रकरणी आरोपी आईला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिने आपल्या पतीवर तो झोपेत असताना कोयत्याने वार करत हल्ला केला. या हल्ल्यात पती दुर्योधन आबासाहेब मिंढे वय वर्षे 36 हे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. अशी माहिती दौंड पोलिस निरिक्षकांनी दिली आहे.
जखमी दुर्योधन मिंढे हे माहिती तंत्रज्ञान कंपनीत संगणक अभियंता आहे. सध्या ते घरातून काम करत आहे. त्यांची पत्नी शिक्षित आहे. हे कुटुंब स्वामी चिंचोली गावात शिंदे वस्ती भागात वास्तव्यास आहे.शनिवारी पहाटे 5 :30 वाजेच्या सुमारास आरोपी पत्नी ने गळा आवळून आपल्या दोन्ही मुलांचा निर्घृण खून केला. नंतर झोपेत असलेल्या आपल्या पतीवर कोयत्याने वार केले.