लोणावळ्याजवळील भाडवली गावातील दोनशेहून अधिक भाविकांना काकड आरतीचा महाप्रसाद खाल्ल्यामुळे विषबाधा झाली आहे. या रुग्णांवर सध्या खासगी आणि सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गेल्या महिन्याभरापासून भडवली येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.
या कार्यक्रमांची सांगता काल करण्यात आली, ज्यासाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं.
यानिमीत्ताने महाप्रसादाचं जेवण झाल्यानंतर भाविकांना उलट्या, जुलाब आणि डोकेदुखाची त्रास व्हायला लागला. यानंतर सर्व भाविकांना तात्काळ स्थानिक सरकारी आणि खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. यापैकी चार लोकांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येते आहे.
भडवली गावात जवळपास सर्वच घरातील कोणी ना कोणी व्यक्ती हॉस्पिटलमध्ये दाखल असून यामुळे गावात शांतात दिसत आहे. सध्या स्थानिक डॉक्टर सर्व रुग्णांवर लक्ष ठेवून आहेत. परंतू या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.