17 जुलैपासून 2023 पासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले. यानंतर पत्रकारांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, पावसाळी अधिवेशनाची सांगता झाली. हे अधिवेशन अतिशय यशस्वी झाले. एकही दिवस सभागृह तहतूब झालं नाही आणि जवळपास 13 दिवस कामकाज झालं आणि 27 विधेयक मांडण्यात आली. यातील 17 विधेयक मंजूर करण्यात आली असून जवळपास 41 हजार 243 कोटी 21 लाख रुपयांच्या पुरवण्या मागण्यादेखील मांडण्यात आल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे म्हणाले की, या अधिवेशनात मंत्री नाही म्हणून कुठेही कामकाज बंद पडले नाही. सर्व मंत्र्यांनी योगदान दिलं. सर्व आमदारांनी आपापल्या मतदारसंघातले किंबहुना राज्यातले महत्त्वाचे विषय या अधिवेशनामध्ये मांडले. त्याला न्याय मिळवून घेण्याचं काम केलं. प्रश्नोत्तर, लक्षवेधी, विविध आयुदा, अवचिताचे मुद्दे, अशा विविध आयुद्याच्या माध्यमातून याठिकाणी आपापला मतदारसंघ किंबहुना राज्यातल्या धोरणात्मक प्रश्नांवर चर्चा केली. सकारात्मक चर्चा झाली आणि एकंदरीत हे अधिवेशन यशस्वी झालं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. विरोधी पक्षाच्या अंतिम आठवडा प्रस्तावात अनेक मागण्या मान्य केल्या. अंतिम आठवडा राज्यातील जनतेच्या दृष्टीने महत्वाचा असतो, असे एकनाथ शिंदे म्हणाले.