आमदार पुन्हा आमच्याकडे येतील, काही जण आमच्या संपर्कातही: संजय राऊत

गुरूवार, 28 जुलै 2022 (14:32 IST)
दहाव्या सुचीनुसार 16 बंडखोर आमदार अपात्र ठरणार कारण संविधानाच्या आणि कायद्याच्या विरोधात कोणतेही न्यायमूर्ती निकाल देणार नाहीत, याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा सत्तांतर झाल्यास आश्चर्य वाटायला नको, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.
 
माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, संविधानाची सीमा ओलांडून न्यायमूर्ती निर्णय देणार नाहीत, असा विश्वास वाटतो. त्यामुळे 16 आमदार अपात्र ठरतील अथवा फुटीर गटाला इतर पक्षात सामिल व्हावे लागेल. दुसऱ्या पक्षात विलीन होण्याबाबत अनेक आमदारांची तयारी नाही. त्यामुळे काही आमदार पुन्हा आमच्याकडे येतील. काही जण आमच्या संपर्कातही आहेत.
 
10 व्या सुचीनुसार 16 आमदार अपात्र ठरतील. त्यामुळे जर उद्या सत्ता परिवर्तन झाले तर आश्चर्य वाटून घेऊ नका. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदेंवर बोलताना ते म्हणाले, शिंदे शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणवून घेत असतील तर शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला दिल्लीत कधी जावे लागले नाही. शिवसेनेचे हायकमांड हे मुंबईत आहेत, त्यामुळे सगळय़ा चर्चा या मुंबईतच होत होत्या

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती