नागपुरात अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर 6 महिने बलात्कार, आरोपीला अटक

शनिवार, 20 सप्टेंबर 2025 (12:45 IST)
नागपुरात एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी देऊन तिच्याच एका मित्राने तब्बल सहा महिने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीला अटक केली आहे. 
ALSO READ: अजित पवार यांनी 9 कलमी 'राष्ट्रवादी नागपूर घोषणापत्र' प्रसिद्ध केले
मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन पीडित आणि आरोपी एकाच कारखान्यात काम करायचे. आरोपीने प्रथम पीडित तरुणीशी मैत्री केली. नंतर तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले.आरोपीने तिच्यावर अ‍ॅसिड टाकण्याची आणि तिच्या आईला इजा देण्याची धमकी देत तिला ब्लॅकमेल करायला सुरु केले नंतर तिला लैंगिक संबंध ठेवण्यास बाध्य करत तिच्यावर सहा महिने बलात्कार केला.
ALSO READ: ठाण्यात सलून चालका कडून वृद्धाची हत्या, सोन्याची साखळी लुटली मृतदेह गटारात टाकला
पीडित तरुणी घाबरली नंतर तिने धाडस करत चाईल्ड लाईनची मदत घेतली. चाईल्ड लाईन टीम ने पीडितेला तात्काळ मदत केली आणि तिला वाडी पोलीस ठाण्यात नेले. पीडित तरुणीने आरोपीच्या विरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीच्या विरुद्धबाल लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (POCSO) कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आणि आरोपीला त्याच्या घरातून ताब्यात घेतले. 
Edited By - Priya Dixit
 
ALSO READ: मुंबई विमानतळावर २० कोटी रुपयांचा गांजा जप्त; दोघांना अटक

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती