अंमलबजावणी संचालनालय (ईडी), मुंबईने बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी अधिकारी (निलंबित) हितेश कुमार सिंगला यांना मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा, 2002 च्या तरतुदींनुसार अहमदाबाद जंक्शन रेल्वे स्टेशनवरून अटक केली आहे. त्यांना ग्रेटर बॉम्बे येथील पीएमएलएच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले, ज्याने त्यांना 7 दिवसांसाठी ईडी कोठडी सुनावली.
सीबीआय आणि एसीबी मुंबईने हितेश कुमार सिंगला आणि इतरांविरुद्ध आयपीसीच्या कलम 409, बीएनएसच्या कलम316(5) आणि पीसी अॅक्ट, 1988 च्या कलम 13(1)(अ) सह 13(2) अंतर्गत एफआयआर दाखल केला होता. या एफआयआरच्या आधारे, ईडीने तपास सुरू केला.
ईडीच्या तपासात असे आढळून आले की, मे 2023 ते जुलै 2025 या कालावधीत, सिंगलाने दुर्भावनापूर्ण आणि गुन्हेगारी हेतूने, परवानगीशिवाय फसवणूक करून मुदत ठेव (टीडी), सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (एससीएसएस) खाती, बचत बँक (एसबी) खाती आणि चालू खाते (सीए) बंद केले. ही रक्कम एसबीआयमधील त्याच्या वैयक्तिक बचत खात्यात जमा करण्यात आली.
या फसवणुकीद्वारे, सिंगलाने बँक ऑफ इंडिया आणि तिच्या ग्राहकांची 16.10 कोटी रुपयांची फसवणूक केली, ज्यामुळे बँकेचे नुकसान झाले.