मिळालेल्या माहितीनुसार या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. बुधवार, १८ जून रोजी सकाळी प्रज्ञा काहीही न सांगता घराबाहेर पडली. ती रात्री ८ वाजता परत आली तेव्हा तिच्या वडिलांनी तिला उशिरा आल्याबद्दल विचारले आणि रागाच्या भरात तिला फटकारले. काही वेळाने, ती पुन्हा काहीही न बोलता घराबाहेर पडली. दुसऱ्या दिवशी, गुरुवारी दुपारी १२ वाजता, तिचा मृतदेह जवळच्या विहिरीत तरंगताना आढळला. स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. शनी पेठ पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह बाहेर काढण्यात आला.