राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बेरोजगारीवरून केंद्रातील आणि महाराष्ट्रातील सरकारवर हल्लाबोल करत भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. रोजगाराच्या संधींचा तुटवडा असल्य़ाने लग्नासाठी योग्य तरुणांना वधू मिळत नसल्याने सामाजिक समस्या निर्माण होत आहेत. असे विधान केले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रस पक्षाच्या जनजागर यात्रेला हिरवा झेंडा दाखवताना त्यांनी पुण्यात सरकार वर टिका केली.
भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सरकार वर टिका करताना ते म्हणाले, “दोन समुदायांमध्ये द्वेष निर्माण करण्यासाठी काही समस्या तयार केल्या जात आहेत. निवडणुकीच्या वेळी दिलेली आश्वासने पूर्ण करता आली नसल्याने ते असे करत आहेत.” असे पवार म्हणाले, नोकरीच्या संधी वाढवणारी धोरणे स्वीकारण्याऐवजी समाजात फूट पाडण्याचे काम भाजप करत असल्याचे सांगून त्यांनी टीकास्त्र सोडले.
Edited by : Ratnadeep Ranshoor