महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, अकोला विभागाचे उपोषण मिटले, 20 सप्टेंबर पर्यंत कारवाई करण्याचे सरकारचे आश्वासन
महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, अकोला विभागाने आयोजित केलेले उपोषण बुधवार, 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी संपले. राज्य परिवहन मुंबईचे महाव्यवस्थापक, मुख्य कामगार अधिकारी आणि अमरावती प्रादेशिक व्यवस्थापक यांनी मध्यस्थी करून 20 सप्टेंबरपर्यंत सर्व प्रलंबित मागण्यांवर कारवाई करण्याचे ठोस आश्वासन दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. प्रशासनाने यापूर्वी दिलेले आश्वासन पूर्ण न झाल्याने संघटनेचे पदाधिकारी 25 ऑगस्टपासून उपोषणावर होते.