महाराष्ट्र सत्तासंघर्ष : सत्तासंघर्षाचा निकाल उद्याच?

बुधवार, 10 मे 2023 (20:34 IST)
संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे व देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा निकाल उद्या लागणार आहे.सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी कोर्टाच्या कामकाज दरम्यान निकालासंदर्भात टिपण्णी केली आहे. घटनापीठाकडून उद्या दोन महत्वाच्या निकाल लागण्याचे संकेत सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी दिले आहेत. त्यामुळे सत्ता संघर्षावरही उद्या निकाल लागण्याची शक्यता आहे.
 
ज्या घटनापीठाला हा निकाल द्यायचा आहे. त्या घटनापीठाचे दोन निकाल प्रलंबित आहेत. एक महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा आणि दुसरा म्हणजे दिल्ली आणि केंद्र सरकारमधल्या अधिकारांच्या वादाचा असे दोन निकाल प्रलंबित आहे. दिल्ली केंद्र सरकारचं प्रकरण पूर्ण झालं आहे. 17 जानेवारीपासून हा निकाल प्रलंबित आहे. 20 जून 2022 रोजी महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणुकीनंतर जे नाट्य रंगलं त्यातून सत्तांतरापर्यंत आणि शिवसेनेच्या फुटीपर्यंत घडामोडी घडल्या. तेव्हापासून हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आलं. 14 फेब्रुवारी ते 16 मार्च सलग सुनावणी झाली आणि तेव्हापासून हा निकाल राखीव आहे.
 
या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार
एकनाथ शिंदे
संदीपान भुमरे
अब्दुल सत्तार
तानाजी सावंत
संजय शिरसाट
यामिनी जाधव
चिमणराव पाटील
भरत गोगावले
लता सोनावणे
रमेश बोरणारे
प्रकाश सुर्वे
बालाजी किणीकर
महेश शिंदे
अनिल बाबर
संजय रायमुलकर
बालाजी कल्याणकर
 
दरम्यान दोन महत्वाचे निकाल उद्या लागणार आहे असे सांगण्यात आले आहे. तसे संकेत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी दिले आहे. विशेष म्हणजे आज संद्याकाळी उद्याच्या सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाचे लिस्टींग होईल. आणि त्यातून उद्या नेमके कोणते प्रकरण कोर्ट हाताळेल हे आज संद्याकाळी स्पष्ट होईल. त्यामुळे कोर्ट निकाल काय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती