मुंबईत पोलिसांना मिळणार 50 लाखांमध्ये घर

बुधवार, 18 मे 2022 (18:02 IST)
राज्य सरकारकडून काही दिवसांपूर्वी आमदारांना मोफत घरे मिळणार असे जाहीर करण्यात आले होते. मात्र तो निर्णय नंतर मागे घेण्यात आला. अशातच आता पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण वरळीतील बीडीडी चाळीमध्ये पोलिसांना घर देण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. परंतु या घरांसाठी पोलिसांकडून 50 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. राज्य सरकारची आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यावेळी वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाबाबत चर्चा झाली.
 
वरळी बीडीडी चाळीत सध्या राहत असलेल्या पोलिसांना 50 लाखांत घरे दिली जातील. तर 2250 पोलीस पोलीस कुटुंबिय तिथे राहत असून माणुसकीच्या भावनेतून त्यांचा विचार करण्यात आला आहे अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. बीडीडी चाळीत पोलिसांना 500 चौरसफुटांची घरे दिली जातील असे ही त्यांनी म्हटले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती