विधानपरिषदेच्या आठ पैकी सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

मंगळवार, 9 नोव्हेंबर 2021 (22:15 IST)
राज्यातील विधानपरिषदेच्या आठ पैकी सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या १० डिसेंबरला मतदान होणार असून १४ डिसेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. यात मुंबईतील दोन जागांसाठी, कोल्हापूर , धुळे अकोला आणि नागपूर विधान परिषदेसाठी निवडणूक होईल. २३ नोव्हेंबर अर्ज दाखल करण्याची तारीख असेल, २४ नोव्हेंबरला अर्जाची छाननी होईल, २६ नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असेल.
 
१ जानेवारी २०२२ रोजी विधानपरिषदेच्या आठ आमदारांचा कार्यकाळ संपत आहे. पण त्यापैकी ६ जागांसाठीच निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या जागांसाठी महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वतंत्र याबाबत उत्सुकता आहे. काँग्रेसने याआधी अनेकवेळा स्वबळाचा नारा दिला आहे. 
 
मुंबईतल्या दोन जागांमध्ये शिवसेनेचे रामदार कदम आणइ काँग्रेसच्या भाई जगताप यांच्या जागांचा समावेश आहे. तर कोल्हापूरमध्ये सतेज पाटील, धुळे-नंदूरबार इथे अमरीश पटेल यांची जागा, नागपूरमध्ये गिरीश व्यास आणि अकोलामधील गोपीकिशन बाजेरिया यांच्या जागेचा समावेश आहे. सोलापूर आणि अहमदनगर जागेसाठी निवडणूक जाहीर करण्यात आलेली नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती