Maharashtra Marathi Breaking News Live Today: नागपूरमध्ये गेल्या 15 वर्षांत किमान 50 विद्यार्थ्यांना ब्लॅकमेल आणि लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली 45 वर्षीय मानसशास्त्रज्ञाला अटक करण्यात आली आहे. हा आरोपी मानसशास्त्रज्ञ विद्यार्थ्यांना सहली आणि शिबिरांवर घेऊन जायचा. या प्रवासादरम्यान आणि कॅम्पमध्ये तो विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषणही करायचा. हा आरोपी मुलींना त्याच्या वासनेचा बळी बनवत असे. तो त्यांचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ देखील बनवत असे. यानंतर तो या मुलींना ब्लॅकमेल करायचा. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....