Maharashtra Board Result 2023 दहावी बारावीच्या निकाल कधी?

Maharashtra Board Result 2023 महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ महाराष्ट्र SSC आणि HSC निकाल (Maharashtra Board Result 2023) लवकरच अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in आणि maharesult.nic.in वर जाहीर होणे अपेक्षित आहे.
 
मागील ट्रेंडनुसार महाराष्ट्र बोर्ड 2023 मध्ये (Maharashtra Board Result) एसएससी निकालापूर्वी बारावीचा निकाल जाहीर करेल. ताज्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, इयत्ता 12वीचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आणि 10 वीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात जाहीर केला जाईल.
 
विद्यार्थी त्यांचा निकाल पुढीलप्रमाणे पाहू शकतील - 
mahahsscboard.in या मंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
होमपेजवरील निकाल (इयत्ता 10, 12) लिंकवर क्लिक करा.
दुसर्‍या पृष्ठावर पुनर्निर्देशित केल्यानंतर, आवश्यक तपशील प्रविष्ट करा.
सबमिशन केल्यानंतर निकाल स्क्रीनवर दिसेल.
आता डाउनलोड करा.
आता त्याची प्रिंटआउट घ्या.
 
यावर्षी महाराष्ट्र बोर्डाच्या एसएससी म्हणजेच दहावीच्या परीक्षा 2 ते 25 मार्च 2023 या कालावधीत झाल्या होत्या तर बारावीच्या परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च 2023 या कालावधीत घेण्यात आल्या होत्या.
 
राज्यभरातील सुमारे 15,77,256 विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र 10वी परीक्षा 2023 साठी नोंदणी केली होती आणि ते त्यांच्या महाराष्ट्र SSC निकाल 2023 ची वाट पाहत आहेत. परीक्षेत एकूण 8,44,116 मुले आणि 7,33,067 मुली होत्या.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती