खासदार शरद पवार : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष निवडीसंदर्भात आज बैठक

शुक्रवार, 5 मे 2023 (07:50 IST)
बुधवारी अध्यक्षपदाचा राजीनामा देताना मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आणि माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायला हवे होते. राष्ट्रवादीच्या नवीन अध्यक्षपदासाठी जी समिती नेमण्यात येणार आहे, त्या समितीने 5 मे रोजी बैठक घ्यावी, त्यात जो काही निर्णय येईल तो आपल्याला मान्य असेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केले.
 
 शरद पवार म्हणाले की, 1 मे 1960 रोजी मी मी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेतली होती, त्यामुळे 1 मे सोबत माझे वेगळे नाते आहे. मी युवक काँग्रेसच्या बैठकीत भाकरी फिरवण्याचं वक्तव्य केले होते. मी युवकांची मतं विचारात घेणारा नेता आहे. त्यामुळे तुमच्या मतांचा मी आदर करतो. ग्रामीण भागातील युवक आणि युवतींना मुख्य प्रवाहात आणायचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
 
हे सर्व तर्क आहे : प्रफुल्ल पटेल
आज सकाळपासूनच सुप्रिया सुळे यांच्या अध्यक्षपदाबाबत चर्चा चालू आहे. मात्र, हे सर्व तर्क असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले. सुप्रिया सुळेंबाबतची चर्चा फक्त तर्कांच्या आधारे केली जात आहे.  पक्षाची अधिकृत व्यक्ती म्हणून मी सांगू शकतो की ना पक्षाची कोणती बैठक झाली, ना कोणता निर्णय झालेला आहे. बैठक होईल, तेव्हा मीच त्म्हाला सांगेन, असे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले. बुधवारी सकाळपासूनच सुप्रिया सुळे यांच्या अध्यक्षपदाबाबत चर्चा चालू आहे. मात्र, हे सर्व तर्क असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले. सुप्रिया सुळेंबाबतची चर्चा फक्त तर्कांच्या आधारे केली जात आहे.  पक्षाची अधिकृत व्यक्ती म्हणून मी सांगू शकतो की ना पक्षाची कोणती बैठक झाली, ना कोणता निर्णय झालेला आहे. बैठक होईल, तेव्हा मीच तुम्हाला सांगेन, असे पटेल यांनी स्पष्ट केले.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती