SSC Result 2022 दहावीच्या निकालाची तारीख जाहीर, येथे Result पाहता येणार

गुरूवार, 16 जून 2022 (16:04 IST)
दहावीच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल 2022 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या 17 जून 2022 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. 
 
12  चा निकाल जाहीर झाल्यानंतर 10 वीचा निकाल कधी लागणार याची सर्व वाट बघत होते. अखेर विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली असून शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी निकालाची तारीख जाहीर केली आहे. सर्व विद्यार्थी आणि पालकांना वर्षा गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 
 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि. १७ जून,२०२२ रोजी दु. १:०० वा.ऑनलाईन जाहीर होईल.#SSC #results@CMOMaharashtra pic.twitter.com/oO0lyRvF3b

— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) June 16, 2022
येथे पाहता येतील निकाल
पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण पुढील अधिकृत संकेतस्थळांवर 17 जून रोजी दुपारी 1 नंतर उपलब्ध होतील. 
 
http://mahresult.nic.in 
http://sscresult.mkcl.org 
https://ssc.mahresults.org.in 
 
या अधिकृत संकेतस्थळांवर निकाल पाहता येणार आहेत. यंदा या परीक्षेस 16,38, 964 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 8,89,506 मुलं असून मुलींची संख्या 7,49,458 एवढी आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती