अरबी समुद्रात नवं संकट

सोमवार, 15 नोव्हेंबर 2021 (16:55 IST)
हवमान विभागानं मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात व कोकणमध्ये जोरदार पाऊस होण्याचा इशारा दिला आहे. 17 नोव्हेंबरच्या आसपास अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे 15 ते 19 नोव्हेंबर दरम्यान राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आल आहे. हवामान शास्त्रज्ञानुसार 15 ते 19 नोव्हेंबरपर्यंत राज्यात काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. पुढील तीन ते चार दिवस ढगाळ वातावरण राहून मराठवाड्यातील बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यात 15 नोव्हेंबर रोजी पाऊस पडेल. तर 16 नोव्हेंबर रोजी उस्मानाबादमध्ये पाऊस पडेल. 
 
17 नोव्हेंबर रोजी लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वार्याुसह पाऊस पडेल, अशी शक्यता व्यक्त करण्याात आली आहे.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती