बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र,आणि कोकणामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे येत्या ३ ते ४ दिवसांत मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये एखाद दुसऱ्या ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाच्या मुंबई केंद्राने दिली आहे. खास करून मराठवाडा व मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भात जोर जास्त असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. अशी माहिती के.एस. होसाळीकर यांनी ट्विट करुन दिली आहे.
यात नाशिक, पुणे,सातारा,औरंगाबाद,यवतमाळ,कोल्हापूर,जालन्यात पुढील तीन दिवसांत ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.राज्याच्या किनार पट्टीच्या भागात ढगांची दाटी दिसत पावसासाठी चांगले चिन्ह दिसत आहे. गेल्या २४ तासात राज्यात, खास करून मराठवाडा व बाजूच्या परिसरात माध्यम ते मुसळधार पावसाच्या नोंदी IMD कडे आली आहे.