प्रेमी जोडप्याना लुटणारी टोळी जेरबंद; प्रेयसीसोबत अश्लील चाळे करायचे

सोमवार, 16 ऑगस्ट 2021 (21:06 IST)
जिल्ह्यातील कळमना परिसरातील रस्त्याच्या कडेला टुव्हीलरवर एकांतात फिरत असलेल्या प्रेमीयुगुलांना चाकूचा धाक दाखवून लुटणारी टोळी पोलिसांनी जेरबंद केली आहे. या लूटमार टोळीने आतापर्यंत अशा अनेक प्रेमी जोडप्याना लुटले आहे. मात्र, बदनामीअंती याबाबत तक्रार दाखल झाली नव्हती. मात्र, आता एका प्रेमी जोडप्यानं याबाबत तक्रार केल्यानं पोलिसांनी त्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. ही कारवाई कळमना पोलिसांनी (Kalamana Police Station) केली आहे. या प्रकरणी टोळीतील लक्ष्मण हटिलदास माणिकपुरी (वय, 26, धरमनगर, कळमना) आणि राहुल सुरेश यादव (वय, 28, भगतनगर, कळमना) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. दरम्यान राहुल उईके हा फरार आहे

अधिक माहिती अशी, कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये अनेक हिरवेगार ‘लव्हर स्पॉट’ आहेत.तसेच शहराच्या बाहेर जाणारे रस्ते असल्यामुळे प्रचंड प्रमाणात प्रेमी जोडपे या परिसरात फिरत असतात.तर, रस्‍त्याच्या कडेला गाडी लावून एकांत जागा शोधात असतात.तर, या प्रेमी जोडप्यांना चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या काही तरुणांच्या टोळ्या या भागात मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्या आहेत.गेल्या काही दिवसात काही जबलपूर रोडवर इंडियन ढाब्याजवळ एक तरुण प्रेयसीसह एकांतात बसला होता. त्यावेळी लक्ष्मण माणिकपुरी  आणि राहुल यादव तसेच, राहुल उईके हे तिघे तेथे आले.त्यांनी प्रेमी जोडप्याला मारहाण केली. तरुणाच्या गळ्याला चाकू लावला आणि प्रेयसीला पर्समधील पैसे, मोबाईल आणि दागिने काढण्यास सांगितले.तिने नकार दिला असता तिच्या प्रियकराच्या मांडीवर राहुलने चाकू मारला.रक्त वाहिल्यांनंतर तरुणीनं जवळील दागिने पैसे दिले.तसेच तरुणाचा मोबाईल देखील काढून घेतला.तसेच त्यांना मारहाण करून तिघे पसार झालीत.यांनतर त्या जोडप्यानं कळमना ठाण्यात फिर्याद दिली.

 या तक्रारीवरून पोलिसांनी लगेच तपासास सुरुवात केली. विजयनगर बाजार चौकातून राहुल यादव आणि लक्ष्मण माणिकपुरीला अटक करण्यात आले आहे. त्यानंतर या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली.त्यांच्याकडून प्रेमी युगुलांकडून लुटलेली रक्कम आणि दुचाकी जप्त केली.या हे लुटारू टोळी तरुणीच्या इभ्रतीवर प्रियकरासमोरच हात टाकतात.बदनामी टाळण्यासाठी शारीरिक संबंधाची मागणी देखील करतात.

तसेच अश्‍लील चाळे देखील करतात.याप्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक केलीय.ही कारवाई ठाणेदार विश्‍वनाथ चव्हाण ( यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक अनिल इंगोले आदी पथकानं केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती