महाराष्ट्र सरकारने दारूवरील उत्पादन शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे राज्यातील मद्यपींना मोठा फटका बसला आहे. इतकेच नाही तर त्याचा थेट परिणाम दारू उत्पादक कंपन्यांच्या शेअर्सवरही झाला आहे. तथापि, एक दिलासादायक बातमी अशी आहे की बिअर आणि वाईन उत्पादक कंपन्यांना याचा फायदा झाला आहे.
महाराष्ट्र सरकारने बियर आणि वाईन दोन्ही उत्पादन शुल्कातून वगळण्याच्या निर्णयानंतर, सुला व्हाइनयार्ड्स लिमिटेड आणि जीएम ब्रुअरीज लिमिटेडच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. सुला व्हाइनयार्ड्सचे शेअर्स 13 टक्के आणि जीएम ब्रुअरीजचे शेअर्स सुमारे 20 टक्के वाढले आहेत.
उत्पादन शुल्कात वाढ झाल्यानंतर, किरकोळ दुकाने तसेच रेस्टॉरंट्स आणि बारमध्ये दारू महाग होईल. तथापि, बिअर आणि वाईनला या कर श्रेणीतून दूर ठेवण्यात आले आहे. हार्ड लिकरच्या तुलनेत बिअरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण कमी असते, म्हणूनच त्याला सूट देण्यात आली आहे.