विधिज्ञ गुणरत्न सदावर्तेंकडून आता 'हा' खटला काढून घेतला

सोमवार, 10 जानेवारी 2022 (21:46 IST)
विधिज्ञ गुणरत्न सदावर्तेंकडून आता हा खटला काढून घेण्यात आला आहे. गुणरत्न सदावर्तेंऐवजी एड. सतिश पेंडसे यांनी या खटल्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.  सदावर्तेंच्या आक्रस्ताळेपणामुळे एसटी कर्मचाऱ्यांची चूल बंद होण्याची वेळ आली आहे. कर्मचाऱ्यांच्या डोक्यामध्ये वकील गुणरत्न सदावर्तेंनी विलनीकरणासंदर्भात भ्रम निर्माण केला आहे. कर्मचारी नैराश्यात असल्याचे वकील म्हणत आहेत. पण गुणरत्न सदावर्ते हेच नैराश्यात आहेत. लोकांना भडकवण्याचे काम ते करत आहेत. दोन महिने सुरु असलेल्या संपामुळे सर्वसामान्य कर्मचाऱ्याची रोजीरोटी बंद होण्याची वेळ आली आहे, असे सुनील निरभवणे यांनी म्हटले आहे. तर, सदावर्ते यांना पत्र दिलंय.. आता आम्ही नवीन वकिल सतिश पेंडसे यांना वकील म्हणून नेमलं आहे. न्यायालय जो निर्णय देईल तो दोन्ही बाजूच्या लोकांना मान्य असेल. सर्व कर्मचाऱ्यांनी ताबडतोब सेवेत दाखल व्हावे, असं आवाहनही एसटी संघटनेच्या अजय कुमार गूजर यांनी केलं. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती