कर्जबाजारी शेतकऱ्याने टोकाचं पाऊल घेत , बायकोसह स्वतःचे आयुष्य संपविले

सोमवार, 10 जानेवारी 2022 (18:54 IST)
सध्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. शेतकरी कर्जबाजारी झालेले आहे. त्यांनी शेतीच्या कामासाठी कर्ज घेतले आहे. शेतकरी पिकाच्या झालेल्या नुकसानीमुळे हवालदिल झाला आहे. कर्जबाजारी झाल्यामुळे शेतकरी टोकाचे पाऊल उचलत आहे. असेच काहीसे घडले आहे. परभणीच्या पालम तालुक्यातील पूयणी    गावात. येथे  एका शेतकऱ्याने कर्जबाजारी झाल्यामुळे कंटाळून आधी स्वतःच्या बायकोचा गळा आवळून खून केला नंतर मग स्वतःने गळफास लावून आपले आयुष्य संपविले.
अल्पभूधारक शेतकरी रंगनाथ शिंदे (45) आणि सविता रंगनाथ शिंदे (36)असे  या मयत झालेल्या शेतकरी दाम्पत्याची नाव आहे. या दांम्पत्याला दोन मुले आहेत 
सध्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे खूपच नुकसान झाले आहे. शेतकरी रंगनाथ यांनी लावलेले  सोयाबीन,  मूग आणि तुरीचे नुकसान झाले . या पिकासाठी त्यांनी बॅंकेकडून कर्ज घेतले होते. पिकाच्या नुकसानी नंतर कर्ज कसे फेडणार याची चिन्ता सतावत असता त्यांनी आधी झोपलेल्या बायकोचा गळा आवळून खून केला नंतर गळफास घेऊन स्वतःचे आयुष्य संपविले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आकस्मिक मृत्यूची नोंद करून दोन्ही मृतदेह ताब्यात घेत शव विच्छेदनास पाठविले आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.   
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती