लवासा : विकास कामांच्या नियोजनाची जबाबदारी पीएमआरडीएकडे

बुधवार, 24 मे 2017 (09:40 IST)
राज्य शासनाने लवासा विशेष प्राधिकरणाचा दर्जा रद्द करण्याचा निर्णय घेतला असून लवासाच्या विकास कामांच्या नियोजनाची जबाबदारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) देण्यात आली आहे.पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ)किरण गित्ते यांनी यास दुजोरा दिला आहे. लवासा विशेष प्राधिकरणाचा दर्जा रद्द करण्याचा निर्णय झाला असल्याचे कळाले आहे.मात्र, अद्याप या संदर्भातील अध्यादेश प्रसिध्द झालेला नाही.अध्यादेशाप्रमाणे पुढील कार्यवाही केली जाईल. लवासाच्या उपलब्ध रेकॉर्डची माहिती घेतले जाईल. तसेच यापुढे लवसातील सर्व विकास कामे पीएमआरडीएच्या माध्यमातून केली जातील. 

वेबदुनिया वर वाचा