शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या; अतिवृष्टीने विद्यापीठाचा निर्णय

गुरूवार, 11 ऑगस्ट 2022 (09:14 IST)
महाराष्ट्र भर पावसाचा जेर वाढत आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर सह कोकण भागात पावसाने थैमान घातले आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी दळणवळण ठप्प झाले आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे.
 
 पश्चिम महाराष्ट्रात गेले काही दिवस पाऊसाची जोरदार बॅटिंग चालु आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचा परिणाम शैक्षणिक क्षेत्रावर सुद्धा झाला आहे. विद्यापिठात सध्या ऑगस्ट २०२२च्या परिक्षा सुरू आहेत. शिवाजी विद्यापीठाचे परिक्षेत्र असलेल्या सांगली, सातारा, कोल्हापूर, आणि सोलापूर जिल्ह्यात पावसाचा जोर असल्याने काही भागात नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन वाहतूक आणि दळणवळण ठप्प झाले आहे. परिक्षेसाठी येणार्या विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी विद्यापीठाने दि १० आणि ११ या दिवशीच्या परिक्षेचं वेळापत्रक स्थगित केले आहे. या दिवशी होणाऱ्या परिक्षेचे सुधारित वेळापत्रक लवकरच सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल असे विद्यापीठ प्रशासनाने जाहीर केले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती