कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या वक्तव्याने पुन्हा वादंग; आता काय म्हणाले ते?

मंगळवार, 7 जून 2022 (14:50 IST)
जळगाव मध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कीर्तन कार्यक्रमात इंदुरीकर महाराजांनी शासकीय अधिकार्‍यांच्या पगाराबाबत असेच वादग्रस्त वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे. तसेच त्याची उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. किर्तनाच्या कार्यक्रमामध्ये इंदुरीकर महाराजांनी करोना कालावधीमध्ये ऑनलाइन माध्यमातून शिक्षण घेऊन पास झालेल्यांना नोकरी मिळणार नाही, असे वक्तव्य केले. तसेच पागर देताना बुद्धी तपासली पाहिजेत असेही इंदुरीकर महाराज यांनी म्हटले, त्यामुळे आता यावरुन नवीन वाद सुरु झाला आहे.
 
आपल्या किर्तनात महाराज म्हणाले की, तीन वर्षात मुलाला पसायदान शिकवू शकले नाहीत. मग १६ वर्षांचा मुलगा बलात्कार करतो, १७ वर्षांचा मुलगा खून करतो त्याचे कारण काय? १८ वर्षांची पाच-सहा मुले रात्री पोलिसांनी एकत्र पकडली तर त्यांच्या गाडीत काय सापडते? त्यांच्या गाडीत सापडतो गावठी कट्टा, नायलॉनची दोरी, मिर्ची पावडर वैगेरे. असे का घडते? असे प्रश्न निवृत्ती महाराजांनी किर्तनादरम्यान उपस्थित केले.
 
महाराष्ट्रातील पोलीस खात जागेवर आहे म्हणून जनता जागेवर आहे. तसेच जगावर आलेल्या सर्वात मोठ्या करोनाच्या संकटावर तिघांनी नियंत्रण मिळवल. एक डॉक्टर, दुसरे पोलीस आणि तिसऱ्या सामाजिक संस्था होय. त्यात डॉक्टरांचे कौतुक एवढे करू नका, पण ज्यांनी स्वत:चा बळी दिला, त्या पोलीस खात्याचे कौतुक करा. करोना योद्ध्याचा सत्कार करायचा असेल तर पहिला पोलिसाचाच करावा. का तर स्वत:चा संसार वाऱ्यावर सोडून ड्युटीशी प्रामाणिक होऊन वेळेत पोहचले होते.
 
मात्र आपल्याकडे उटले नियम आहेत. खरी कष्टाची ड्युटी त्यांची आहे. त्यांना पगार कमी आणि ज्यांना काहीच काम नाही, त्यांना पैसाच मोजता येत नाही एवढा पगार आहे. शासकीय सेवेत असणाऱ्या अधिकाऱ्यांचे पगार हे बुद्धीवर असले पाहिजे,असेही निवृत्ती महाराज म्हणाले. त्यासाठी एक जानेवारीला मेंदू तपासायचा. जितकी बुद्धी कमी असेल तेवढा पगार कमी करायचा. हा विनोद नाही, असेही महाराज म्हणाले. तसेच सर्व वारकरी एकत्र आले तर देश बदलू शकतात, असे वक्तव्यही त्यांनी यावेळी केले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती